Wednesday, August 22, 2012

काही बोलायाचे आहे..

जगण्याचा संघर्ष हा तसा नेहमीचाच. सगळ्यांच्याच वाट्याचा. चुकत कोणालाच नाही. पण आजच्या तथाकथित पुढारलेल्या जगात अजूनही स्त्रियांना जेव्हा विचित्र वागणूक, विचित्र नजरा सहन कराव्या लागतात तेव्हा खरोखर काहीच उमगेनास होतं. आपण फक्त बाहेरुन बदललोय.. मानसिक वृत्ती काही सुधारायच्या बेतात दिसत नाही. कदाचित कधीच नाही बदलणार. एक उपभोग्य वस्तू यापलीकडे काहीतरी अस्तित्त्वाला अर्थ यावा असं वाटणं यात काय गैर आहे? व्यक्तीस्वातंत्र्य ही फक्त बोलाचीच कढी असल्यासारखं वाटत राहतं. अजूनही so called metropolitan शहरात सुशिक्षित (!) लोक आजूबाजूला असतानाही एक स्त्री म्हणून मुक्तपणे, स्वतंत्रपणे, निर्भयतेने जगता येत नाही हेच खरं. काही दिवसांपूर्वी गुवाहाटी मध्ये घडलेल्या ओंगळवाण्या प्रवृत्तीचे विकृत दर्शन घडवणाऱ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक पोस्टर पाहण्यात आलं होतं.

हा सोनियाचा दिन कधी उगवणार आहे काय?

3 comments:

  1. विकृतीच जेव्हा बनते प्रवृत्ति ,
    तेव्हा हतबल ठरते प्रकृति...

    ReplyDelete
  2. जेव्हा दिल्ली सारख्या शहरात स्त्रियांना संध्याकाळनंतर बाहेर पडायची भीती आहे तिथे बाकीच्यांची काय कथा! देशाच्या ऐन राजधानीत स्त्री सुरक्षित नाही! आणि वर गुरगाव पोलिसांनी रात्री आठ नंतर स्त्रियांनी बाहेर पडू नका म्हणून सांगितलंय म्हणे! म्हणजे गैरवर्तणूक करणाऱ्यांना कसली ताकीद नाही, पण जे अफेक्ट होणार आहेत त्यांनाच ताकीद.

    असो. मेरा भारत महान.

    ReplyDelete
  3. खरंय...
    पण या विषयाला बरेच पैलू आहेत असं मला वाटतं.

    एकूण पाहता आपल्याकडे ग्रामीण समाज आणि शहरी समाज असं ढोबळमानाने वर्गीकरण करता येईल. शहरी समाज तसा पुरोगामी असल्याच दाखवतो. ग्रामीण समाज काही अंशी अजूनही जुन्या विचारांचा आहे. तो सुद्धा पुढारतोय म्हणा पण कासवाच्या गतीने. त्यांची राहणी, वेशभूषा (बऱ्याच अंशी), एकंदर दैनंदिन जीवन यात कमालीची तफावत आहे. पण स्त्रियांचे प्रश्न मात्र काही फार वेगळे नाहीत (मुख्यत: सुरक्षिततेच्या बाबतीतले). मग या सामाईक समस्येच मूळ आहे तरी नक्की कुठे?

    शिकलेल्या लोकांची मानसिकता बदलते असं समजणं किती बरोबर आहे?... सुशिक्षित असलेली प्रत्येक व्यक्ती सुसंस्कृत असेलच असं नाही. अशा प्रकारचे गुन्हे करणारे अशिक्षितच असतात असं नाही.

    बऱ्याचदा या गोष्टींचं खापर स्त्रियांच्या वेशभूषेवर आणि एकूणच वागणुकीवर फोडलं जातं. काही वेळा हे कारण असूही शकतं पण पूर्ण कपड्यातल्या स्त्रियांवर अत्याचार होत नाहीत असही नाही. प्रश्न मानसशास्त्राचा म्हणावा कि समाजशास्त्राचा??
    एकूणच सगळ्यांनीच थोडा विचार करायची गरज आहे. स्त्रींकडे उपभोग्य वस्तू म्हणू बघण्याच्या वृत्तीला वाढीस लावायला काही अंशी स्त्रिया सुद्धा जबाबदार आहेत. निश्चितच व्यक्तिस्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. पण स्वातंत्र्याला मर्यादा नसेल तर त्याचा रुपांतर स्वैराचारात होतं. स्त्रियांना प्रथमत: अंगप्रदर्शनाची गरज का वाटते?
    अशा केसेस मध्ये पुरुष जो युक्तिवाद करतात तोही सांगतो. "मुळातच निसर्गाने पुरुषाची निर्मिती अशी केलीये. पण तो हे विसरतो कि त्याच निसर्गाने संयमासारखी शक्ती सुद्धा प्रत्येकाला दिलेली असते. हे पोस्टर कदाचित हेच सांगू पहातय.

    ReplyDelete