Saturday, September 19, 2009

SPECIAL.... JUST LIKE THAT !!!

19 sept '09
@ 10.30 am

काही काही दिवस असेच असतात. काहीच विशेष घडत नाही.. साधे सरळ ... तरीही खूप छान.. प्रसन्न !!!!आजचाही दिवस तसाच आहे. आताशी सकाळचे साडेदाहाच वाजताहेत.. पण तरीही खूप वेळ गेल्यासारखा वाटतोय.

कालच मीरा इकडे परत आलीये. गेल्या आठवडाभर ती नव्हती. त्यामुळे खूप वेगळंच वाटत होत. किती पटकन सवय होते न माणसाच्या असण्या किंवा नसण्याची?

आज आम्ही सक्काळी सक्काळी मारवाखंडी वर फिरायला गेलो. बऱ्याच दिवसानंतर तिकडे चक्कर टाकली. नेहमीप्रमाणे आजही मारवाखंडीने आम्हाला निराश केले नाही. प्रत्येक वेळचा देखावा वेगळा असतो.. प्रत्येक अनुभव नवा असतो.. तसाच आजचाही.. तसा नेहमी आम्ही संध्याकाळच्या वेळी जातो तिकडे फिरायला. कारण त्यावेळी प्राण्यांचे दर्शन होण्याशी शक्यता जास्त असते. पण गेले काही दिवस इथे दुपारनंतर इतका मुसळधार पाऊस पडतोय की बाहेर पडणं अशक्यच झालं होत जणू.. पण आज आता मस्तपैकी ऊन पडलंय.. पण वातावरणातला ओलावा अजूनही तसाच आहे..त्यामुळेच कदाचित आणखी छान, प्रसन्न वाटतंय ...!! म्हणूनच आम्ही आमची नेहमीची प्रथा मोडून सकाळी सक्काळी आमची पावले त्या दिशेला वळवली.

आज सगळी झाडे हिरवीगार वाटत होती.. तळ्यातल पाणी नितळ..स्वच्छ.. समोरचा निलगिरी धीरगंभीर.. शांत..ढग उतरले होते खूप.. ढगांमध्ये तो निम्मा अर्धा हरवून गेला होता जणू.. ध्यानस्थ ऋषीमुनींना आजूबाजूचं भान नसाव ना.. तसं..तो आपला आहे तसाच अचल, स्थिर.. सूर्यकिरणांमुळे एक आगळं तेज मिळालेलं सगळ्या देखाव्याला.. अचानक आम्हाला दूरवर काहीतरी दिसल.. थोडीशी हालचाल जाणवली. पाणवठ्यावर कुणीतरी आल होत. हरीण? नक्की नाही.. कारण एक म्हणजे हरणे शक्यतो कळपाने वावरतात. एकटीदुकटी हरणे आम्ही अजून तरी पहिली नाहीत. दुसरं म्हणजे त्याची चालही हरणासारखी भासली नाही (हरणे जशी तुरुतुरु आणि उड्या मारत चालतात तसा काही जाणवलं नाही) त्यामुळे तो बिबट्या किंवा वाघ असावा. जवळपास आठ दहा मिनिटे तो तिथे होता. पाणी पिऊन त्याने इकडे तिकडे केल.. आणि निवांतपणे चालत परत झाडीत शिरला.. आमच्याकडे नेमकी दुर्बीण नव्हती.. नाहीतर असं अंदाज बांधत नसत बसाव लागल! शेवटी तो निधून गेला आणि " आम्ही आज काहीतरी पाहिलं !! (?) " या आनंदात आम्ही परत फिरलो.

येतायेता नेहमीप्रमाणे गणपतीच्या देवळात गेलो. आज घट बसताहेत. आजपासून नवरात्र सुरु! म्हणून की काय कोण जाणे पण आज देवळात पण पूजा होती कसलीतरी. आज त्यांनी नवीन मुखवटा बसवला होता गणपतीला . फुलांनी, हारांनी सजवलेला गणपती जाताजाता आणखी मन प्रसन्न करून गेला. जणूकाही आजचा दिवस आनंदात जावो असा आशीर्वादच दिला त्याने!!

म्हणूनच तर.. फार काही special नसलेला, पण तरीही खास असा आजचा दिवस.. रोजचा दिवस असाच असता तर???????